Ad will apear here
Next
राष्ट्रीय टेनिस स्पर्धेत वैष्णवी आडकर उपविजेती
पुणे : केरळ टेनिस क्लब आणि ऑल इंडिया टेनिस असोसिएशन यांच्या वतीने त्रिवेंद्रम टेनिस क्लब या ठिकाणी नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय टेनिस स्पर्धेत पुण्याच्या वैष्णवी आडकरने उपविजेते पद मिळविले. १६ वर्षांखालील गटात वैष्णवीने हे यश मिळविले आहे.

या वेळी झालेल्या अंतिम फेरीत तेलंगणाच्या भक्ती शहा हिच्याबरोबर तब्बल तीन तास वैष्णवीचा सामना रंगला. ज्यामध्ये ३-६, ६- २ आणि ३-६ गुणांनी वैष्णवी उपविजेती ठरली.          

वैष्णवी ही एरंडवणे येथील अभिनव इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आठवीत शिकत असून, बाउन्स टेनिस अॅकॅडमीचे केदार शाह यांच्याकडे ती प्रशिक्षण घेत आहे. नुकतेच हैद्राबाद येथे झालेल्या टेनिसच्या नॅशनल सीरीज स्पर्धेत १४ वर्षांखालील गटात वैष्णवीने एकेरी व दुहेरी स्पर्धेत यश मिळविले होते.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/UZOZBS
Similar Posts
टेनिस बॉल उचलण्यासाठी रोबोट सज्ज पुणे : टेनिसकोर्टावर टेनिसपटूंनी मारलेल्या फटक्यांनी खाली पडलेले बॉल उचलून देण्याकरता टेनिस बॉल बॉय आणि गर्ल्स असतात. अनेकदा खेळ थांबवून बॉल उचलावे लागत असल्याने खेळाडूंचे लक्ष विचलित होते. या समस्येवर आता व्हीआयटी अभियांत्रिकी महाविद्यालायाच्या विद्यार्थ्यानी उपाय शोधला आहे. त्यांनी एक रोबोट बनवला
वैष्णवी आडकर, इरा शहा गुवाहाटी सुपर सिरीजच्या विजेत्या पुणे : येथील वैष्णवी आडकर आणि इरा शहा यांनी गुवाहाटी येथे नुकत्याच पार पडलेल्या सुपर सिरीज टेनिस स्पर्धेत विजेतेपद पटकावले असून, अनुक्रमे १४ आणि १२ वर्षांखालील गटात त्यांनी हे यश मिळविले आहे. ऑल इंडिया टेनिस ओसिएशन आणि आसाम टेनिस असोसिएशन यांच्या वतीने गुवाहाटी येथे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते
‘रोझरी’तर्फे केरळ पूरग्रस्तांना मदत पुणे : येथील रोझरी एज्युकेशन सोसायटीच्या वतीने केरळमधील पूरग्रस्तांसाठी एक हजार ब्लॅंकेट, लहान मुलांसाठी आवश्यक औषधे, गोळ्या, एक हजार किलो तांदूळ आणि एक हजार किलो डाळ असे साहित्य पाठवण्यात आले.
अल्लाना इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांची केरळला मदत पुणे : महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या ‘अल्लाना इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स’च्या विद्यार्थ्यांनी केरळ पूरग्रस्तांसाठी अन्न, पाणी, कपडे, औषधे आणि मदतनिधी जमा करून केरळला पाठविण्याची व्यवस्था केली. प्राचार्य आर. गणेशन यांच्या मार्गदर्शनाखाली ही मदत मोहीम आयोजित करण्यात आली.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language